सामग्री पर जाएँ

फैज़पुर

फैज़पुर
Faizpur
मार्च 1988 में धनाजी नाना महाविद्यालय, फ़ैज़पुर में प्रेरणा स्तम्भ (प्रेरणा टॉवर), जिसका उद्घाटन तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी ने किया था
मार्च 1988 में धनाजी नाना महाविद्यालय, फ़ैज़पुर में प्रेरणा स्तम्भ (प्रेरणा टॉवर), जिसका उद्घाटन तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी ने किया था
फैज़पुर is located in महाराष्ट्र
फैज़पुर
फैज़पुर
महाराष्ट्र में स्थिति
निर्देशांक: 21°10′N 75°51′E / 21.17°N 75.85°E / 21.17; 75.85निर्देशांक: 21°10′N 75°51′E / 21.17°N 75.85°E / 21.17; 75.85
देश भारत
प्रान्तमहाराष्ट्र
ज़िलाजलगाँव ज़िला
जनसंख्या (2011)
 • कुल26,602
भाषा
 • प्रचलितमराठी
समय मण्डलभारतीय मानक समय (यूटीसी+5:30)
पिन425503
टेलिफोन कोड02585
वाहन पंजीकरणMH-19

फैज़पुर (Faizpur) भारत के महाराष्ट्र राज्य के जलगाँव ज़िले की यावल तालुका में स्थित एक नगर है।[1][2]

1937 ईस्वी में भारतीय राष्ट्रीय कान्ग्रेस की 49 वीं वार्षिक बैठक (अधिवेशन) का आयोजन जवाहरलाल नेहरू की अध्यक्षता में वर्तमान फैज़पुर, जलगांव जिला, महाराष्ट्र में किया गया था ।

फैजपूर - कथेत शोभेल असे गाव

वैशाली महिपतरा… 12/12/2018

_Faizpur_Village_6.jpgभुसावळ तालुक्यातील फैजपूर हे कथेत शोभेल असे नगर आहे. माणसाला इतिहास असतो, त्याला त्याचे खास असे व्यक्तिमत्त्व असते. फैजपूरचे तसेच आहे. यावलहून बऱ्हाणपूरला जाणाऱ्या फौजांचा मुक्काम तेथे असायचा. त्यामुळे ते ठिकाण फौजपूर, आणि फौजपूरचे फैजपूर झाले असावे. गुप्त घराण्यातील राजा चंद्रगुप्त याचा तळ फैजपुरास होता, म्हणे. त्याचप्रमाणे यादव राजेदेखील काही दिवस त्या भूभागाचे अधिपती होते. गावाला पूर्वी चारही बाजूंनी भिंती बांधलेल्या होत्या. भिंतींचे अवशेष काही ठिकाणी आढळतात. गावाला ‘न्हावी दरवाजा’, ‘पिंपरूड दरवाजा’ आणि ‘शहर दरवाजा’ असे तीन दरवाजे होते. पिंपरुड दरवाजा ज्याला म्हणायचे तो दरवाजा मुख्य होता. त्याला प्रवेशद्वार असेही म्हणत. सध्या त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. गावात जाताना डावीकडे वळल्यावर, बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसतो. ‘शहर दरवाज्या’चे वैशिष्ट्य असे, की त्या दरवाज्यातून नवरदेव ‘बिदा’ व्हायचा. लेकुरवाळी बाई तिच्या सासरी त्याच दरवाज्यातून जाते. तो दरवाजा पूर्वाभिमुख असल्यामुळे उदयोन्मुख होणे हा हेतू त्यात असावा. फैजपूर गावाचा तालुका यावल असून जिल्हा जळगाव आहे. जळगाव जिल्हा हा पूर्व खानदेश म्हणून ओळखला जातो. यावल तालुक्यात एक्क्याण्णव खेडी आहेत. फैजपूर हे गाव यावलपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. फैजपूर या गावाची लोकसंख्या सव्वीस हजार सहाशे दोन एवढी असून पुरुष संख्या तेरा हजार सहाशेत्र्याहत्तर आणि स्त्रियांची संख्या बारा हजार नऊशेएकोणतीस  एवढी आहे. बऱ्हाणपूरला जात असताना फैजपूर गाव येते. गुप्त घराण्यातील राजा चंद्रगुप्त यांचा तळदेखील या गावातच होता. त्याचप्रमाणे यादव राजेदेखील काही दिवस या भूभागाचे अधिपती होते. तेथील बोलीभाषा अहिराणी तसेच मराठी, हिंदी, खानदेशी यांचे मिश्रण असलेली भाषाही बोलली जाते. गावात नगरपालिका असून सतरा वार्ड आहेत.

गाव पूर्वी छोटे होते. ‘रंगारघाटी’ हा गावातील सर्वात उंच भाग. टेकडीच समजा! घाटीच्या अवतीभोवती गाव वसलेले आहे. तेथील रंगकाम, खंडोबावाडी, गणपतीवाडी, तूपबाजार, सत्पंथी  मंदिर, बुधवारचा बाजार, छत्तीस सालची काँग्रेस, संत खुशाल महाराज, हातमागावरील बुगडी काठांचे खण, जिनिंग अँड प्रेसिंग कारखाने, शेंगदाण्याचे शुद्ध तेल, केशवसुत व मर्ढेकर यांचे तेथील वास्तव्य या सर्व गोष्टींचा इतिहास लिहिला तर मोठा ग्रंथच होऊ शकेल! त्यांतील काही गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत, तर काही त्यांची परंपरा चालवत आहेत.

_Faizpur_Village_1.jpgसर्व जातिधर्मांचे लोक गावात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. बाहेरच्या गावांहून नोकरीच्या निमित्ताने तेथे आलेले पुष्कळ लोक स्थायिक झाले आहेत. कारण गाव मध्यवर्ती असून शिक्षणाच्या सर्व सोयी तेथे उपलब्ध आहेत. पूर्वी तटभिंतींच्या आत वसलेले छोटे गाव भिंती ओलांडून चारही दिशांना वाढले आहे. वेगवेगळ्या वसाहतींच्या, वेगवेगळ्या नगरांच्या, वेगवेगळ्या नावांच्या पाट्या दिसू लागल्या आहेत. त्या गावात ‘सावदा-फैजपूर सप्लाय कंपनी’ची वीज जवळ जवळ 1942 पासून होती. गावाच्या वाट्यावर शेतजमिनीचे क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून फैजपूरच्या लोकांनी पहिल्यापासून त्यांचे लक्ष व्यापाराकडे केंद्रित केले. वीज पुरवठा, व्यापारीकरण, नगरपालिका, शैक्षणिक सुविधा यांमुळे तेथील राहणीमान परिसरातील खेड्यांपेक्षा जरा वेगळे होते. त्या वेगवेगळेपणात दिवसेंदिवस भर पडत गेली आणि त्यामुळे त्या गावाचे आकर्षण वाढले व स्वाभाविकच, स्थायिक लोकांच्या संख्येत सारखी वाढ होत गेली. गावात मधुकर सहकारी साखर कारखाना जळगाव जिल्ह्यातील तो पहिला साखर कारखाना आहे.  हिंगोणा  येथे मोर धरण असून तेथे माजी खासदार विद्यमान आमदार श्री.हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातुन सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे.

फैजपूरला रंगकामाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता. रंगारघाटीत रंगारी भावसार यांनी तयार केलेला रंग खूप प्रसिद्ध होता. अजिंठा येथे जो निळा रंग आहे तो तेथूनच नेला आहे, असे सांगतात. रंगारी रंग तयार करून सूत रंगवत असत. त्या सुताला सर्वत्र मागणी होती. आता तो व्यवसाय नामशेष झाला आहे. भावसार समाजाचे लोक वेगवेगळ्या व्यवसायांकडे वळले आहेत. तेथील हातमागाच्या बुगडी काठांच्या खणांना परिसरातच काय, पण बाहेरगावातही मागणी असायची. घरोघर, हातमाग चालवणारे विणकर मोठ्या प्रमाणात होते. तो व्यवसाय दृष्टिदुर्लभ झाला आहे. विणकरांनी त्यांच्या रेशमी धाग्यांनी बुगडी काठांचे खण विणले; रंगाची रंगारी रग रेशमावर उधळणारे रंगारी आणि बुगडी काठांतून रेशीम विणणारे विणकर यांनी फैजपूरचा जो ऐतिहासिक कलात्मक जीवनपट लोकांसमोर ठेवला त्याच्या केवळ आठवणी उरल्या आहेत! विविध प्रकारचे कपडे वगैरेंची मोठमोठी दुकाने गावात आहेत, पण ते कपडे बाहेरून येतात!

फैजपूरचे संत खुशाल महाराज हेदेखील भावसार समाजातील होते. त्या संतांच्या संदर्भात एक आश्चर्यकारक घटना लोकमानसात रूढ आहे. संत खुशाल महाराजांना देणे असलेले लखमीचंद सावकाराचे दोनशेचाळीस रुपये प्रत्यक्ष विठ्ठलाने अदा केले! त्यासंबंधीची 1837 मध्ये विठ्ठलाला दिलेली मोडी लिपीतील पावतीही खुशाल महाराजांच्या मंदिरात उपलब्ध आहे! महाराजांच्या नावाने कार्तिक महिन्यांत फैजपूर येथे रथोत्सव साजरा होतो. महाराजांचे पुत्र श्रीहरी महाराज यांनी ती प्रथा खुशाल महाराजांच्या मृत्यूनंतर, 1885 साली सुरू केली. खुशाल महाराजांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात ‘श्रीदशावतार चरित्र ग्रंथ’ हा महत्त्वपूर्ण आहे. त्या ग्रंथाचे एकूण सेहेचाळीस अध्याय आहेत. खुशाल महाराजांना त्यांनी वीस अध्याय लिहिल्यावर देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीहरी महाराज यांनी सव्वीस अध्यायांची भर घालून ग्रंथ पूर्ण केला. तो ग्रंथ पितापुत्रांच्या एकात्म भावनेमुळे सलग असाच वाटतो. पांडुरंग स्वप्नात येणे, विठ्ठलाची मूर्ती सामानात येणे वगैरे कथा संत खुशाल महाराजांच्या चरित्रात आहेत. त्या कन्हैयालाल धोंडू मोरे यांनी ‘श्रीव्यासपुरी महात्म्य’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.

_Faizpur_Village_3.jpgकाँग्रेस पक्षाची खेड्यातील पहिली सभा (वार्षिक अधिवेशन) 1936 साली फैजपूरास भरली. फैजपूरचे नाव काँग्रेस अधिवेशनामुळे भारतभर झाले. स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण पान त्या काँग्रेसमुळे लिहिले गेले. महात्मा गांधी यांच्यासह तत्कालीन थोर मान्यवर व्यक्तींचे पाय फैजपूरच्या मातीला लागले. त्या ठिकाणी आता ‘नेहरू विद्यानगर’चा परिसर आहे. तेथे धनाजी नाना विद्यालय, बी.एड. कॉलेज व फार्मसी इन्स्टिट्यूट आहेत. काँग्रेसची आठवण म्हणून तेथील दर्शनी भागी, छत्रपती शिवाजी महाद्वाराच्या समोर ध्वजज्योत असलेला प्रेरणास्तंभ आहे. तेथेच, 1936 सालच्या काँग्रेसचे प्रेरणास्थान असलेले धनाजी नाना चौधरी यांचा पुतळा आहे. भव्य, देखण्या आणि सुसज्ज इमारती व प्रशस्त क्रीडांगण असा तो परिसर अतिशय सुंदर आहे. तो शैक्षणिक अभिवृद्धीची साक्ष देतो. धनाजी नाना यांचा सामाजिक व राजकीय लढ्यांचा वारसा पुढे त्यांचे पुत्र मधुकरराव चौधरी यांनी समर्थपणे चालवला.

‘जिनिंग अँड प्रेसिंग’चे कारखाने म्हणजे फैजपूरची मोठी शान होती. गावात कापसाचा व सरकीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. तेथील दर्जेदार कापसाच्या कहाण्या सांगितल्या जात. त्या कारखान्यांचे केवळ अवशेष उरले आहेत. त्यांच्या जागी सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. तेथील ‘भवानी ऑईल मिल’चे तेल त्याच्या क्वालिटीमुळे परदेशातही जायचे, भागीदारीत असलेली ती ऑईल मिल बंद पडली. बोमटू पाटील यांच्या ‘ऑईल मिल’ची परंपरा मात्र त्यांचे चिरंजीव चोलदास शेठ चालवत आहेत. तेथे तयार होणाऱ्या गोडतेलाला उत्तम अशी चव असायची. त्यामुळे लग्नाच्या पंगतीत वरणावर तुपाऐवजी तेल वाढण्याची पद्धत फैजपुरात होती. ती ‘डालडा’च्या जमान्यात बंद झाली.

फैजपुरास बुधवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजाराचे आकर्षण गावातील लोकांनाच काय, परंतु पंचक्रोशीतील गावांनाही मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईत स्टेशनवर लोकल आली, की जशी गर्दी दिसते तशी गर्दी सुभाष चौकात व बाजारात बुधवारी दिसते. बुधवारी फैजपुरात गावरान तुपाचा बाजार वाणी गल्लीत भरायचा. सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान भरणारा तो बाजार म्हणजे पूर्वी मोठे अप्रूप वाटायचे. जिल्ह्यामध्ये त्या तुपाची प्रसिद्धी होती. तेथील गावरान तुपाचे डबे परदेशात पाठवले जायचे. फैजपूरचे तूप म्हणजे खानदेशचे तूप म्हणून ओळखले जात होते. गावात पिठले-भाकर, शेव भाजी, भरीत पुरी इत्यादी प्रकारचे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत.

_Faizpur_Village_5.jpgगावाच्या पूर्वेला गणपतीवाडी आहे आणि पश्चिमेला खंडोबावाडी आहे. त्या दोन वाड्यांच्या मध्ये पूर्वी वसलेले फैजपूर गाव. ते आध्यात्मिक क्षेत्रातही कमी नाही. लेंडी आणि धाडी नद्यांच्या काठी वसलेली खंडोबावाडी आणि गणपतीवाडी ही तेथील फार जुनी देवस्थाने आहेत. खंडोबाचे मंदिर तर फार जुने. ग्वाल्हेरच्या राजाने दिलेली खंडेरावाची मंदिरातील अश्वारूढ मूर्ती प्रेक्षणीय आहे.

गणपतीवाडी हे फैजपुरातील जुने देवस्थान आहे. त्याच्या समोर संतोषीमाता व महादेव यांची मंदिरे आहेत. वाडीत गुरुपौर्णिमेला गोपाळकाला केला जातो. गणपतीवाडीच्या देवस्थानापासून काही अंतरावर खुशाल महाराजांचे समाधी मंदिर आहे. गणपतीवाडीत सध्या नामशेष झालेली जी पायविहीर आहे ती अहिल्याबाई होळकर यांनी बांधून दिली होती.

फैजपूरचे सत्पंथी मंदिर फार जुने झाले होते. त्या मंदिरातील आचार्य श्री जगन्नाथ महाराज यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या समोर महाराजांनी ‘संतकृपा आश्रम’ असे नामकरण करून देखण्या वास्तूची निर्मिती केली. विविध प्रकारच्या तसबिरींमुळे व तैलचित्रांमुळे त्या आश्रमातील हॉलला विशेष शोभा प्राप्त झाली आहे.

फैजपुरचे आध्यात्मिक वातावरण बदलत्या काळानुसार लोप पावलेले नाही, तर ते दिवसेंदिवस वाढत असून मंदिर व देवस्थान यांचा जीर्णोद्धार होताना दिसत आहे. मानवी जीवनातील ताणतणाव, दुःख वगैरे विसरण्यासाठी अशी देवस्थाने थोडाफार तरी परिणाम करत असतात. माणसाच्या बेछूट वागण्याला एक प्रकारचा लगाम त्यांमुळे मिळत असतो. गावातील राममंदिर, बाजारातील राम, विठ्ठल, खंडेराव, सत्पंथी, गावठाणाजवळील दत्त, अंबिका, मारुती, लक्ष्मीनारायण, गणपती, गुरुनानक, सिद्धिविनायक, हिंगलाजमाता मंदिरे, गावातील मशिदी... परमेश्वर एकच आहे, त्याला भजण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत असेच जणू ही पूजास्थाने सुचवत आहेत व गावातील मंदिरांमुळे आध्यात्मिक वातावरण टिकून आहे.

_Faizpur_Village_2.jpgफैजपूरचे नाव एका कलात्मक गोष्टीसाठी परदेशांपर्यंत अलिकडील काळात पोचले आहे. ती कलात्मक गोष्ट म्हणजे तेथील सहकारी औद्योगिक वसाहतीत तेरा क्रमांकाच्या प्लॉटमध्ये तयार होणारे घडीचे लाकडी देव्हारे. प्रभुदास, ईश्वरदास आणि किशोरदास या तीन बंधूंनी गेल्या काही वर्षांपासून त्या वसाहतीत देव्हाऱ्यांची निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या आकाराचे सुंदर असे देव्हारे तेथे तयार होतात.

मराठीतील थोर साहित्यिकांचा अधिवास फैजपुरास लाभला आहे. मराठीतील महत्त्वाचे कवी, समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांचे बालपण फैजपुरात गेले. त्यांचे  प्राथमिक शिक्षणही फैजपूरलाच झाले. अर्वाचीन मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचेही वास्तव्य फैजपुरात होते.

आटपाट नगर फैजपूरची कथा अशी आहे. श्रद्धा, क्रांती, स्फूर्ती, कला, शिक्षण, साहित्य आणि व्यापार या क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या फैजपूर नगराने कात टाकली असली तरी काही क्षेत्रे ही अजून टिकवून ठेवली आहेत. म्हणून माझे गाव फैजपूर हे मला स्वर्गाहूनही सुंदर, मनमोहक, रमणीय व आदर्श गाव असल्याचे पदोपदी अनुभवाला येते ,सौजन्य:-एल ओ चौधरी सर

इन्हें भी देखें

सन्दर्भ

  1. "RBS Visitors Guide India: Maharashtra Travel Guide Archived 2019-07-03 at the वेबैक मशीन," Ashutosh Goyal, Data and Expo India Pvt. Ltd., 2015, ISBN 9789380844831
  2. "Mystical, Magical Maharashtra Archived 2019-06-30 at the वेबैक मशीन," Milind Gunaji, Popular Prakashan, 2010, ISBN 9788179914458